The गडविश्व
ता.प्र / धानोरा : येथील जे .एस .पी. एम. महाविद्यालयात राजश्री छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करण्यात आले.
६ मे १९२२ या दिवशी राजश्री शाहू महाराजांचे निधन झाले त्या दिनाला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने १०० सेकंदासाठी स्तब्ध होऊन प्राध्यापक व कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी शाहू महाराज यांना मानवंदना दिली.
याप्रसंगी प्रा .डॉ .राजु किरमिरे, प्रा. डॉ. लांजेवार यांनी शाहू महाराज यांच्या व्यक्तिमत्व व जीवन कार्यावर विचार व्यक्त केले. याप्रसंगी राजश्री शाहू महाराजांना त्यांच्या १०० व्या स्मृती दिनानिमित्त केले जाणारे सामूहिक वंदन प्राध्यापक कर्मचारी व विद्यार्थी यांच्याकडून १०० सेकंद स्तब्धता रुपी वंदन करण्यात आले. या वंदन कार्यक्रमात शाहू महाराजांची थोरवी माहिती व्हावे या निमित्ताने शाहू महाराजांनी आपल्यासाठी किती काय काय करून ठेवले आहे. त्यांचे स्मरण केले.
संचालन प्रा.ज्ञानेश बनसोड यांनी केले तर आभार डॉ.प्रियंका पठाडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.डॉ. पंढरी वाघ , प्रा. डॉ. दामोदर झाडे,प्रा डॉ प्रविण गोहणे, प्रा.मांतेश तोंडरे , प्रा नितेश पुण्यप्रेड्डीवार, प्रा धावनकर, संजय मुरकुटे , प्रा. प्रशांत वाळके , प्रा. गीता भैसारे, प्रा. ढाकडे , प्रा. निवेदीका वटक, प्रा. करमणकर, प्रा.रंनदिवे, प्रा आवारी तसेच लिपिक वसंत चुदरी , श्रीमती अल्का सजनपवार, हरीचंद्र गोहणे , वाढणकर , हर्षे , राजगडे यांनी सहकार्य करुन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.