– २५ रक्तदात्यांनी केले रक्तदान
The गडविश्व
गडचिरोली : आरमोरी तालुक्यातील जोगीसाखरा येथे शिव जयंतीनिमित्त स्वयं रक्तदाता गडचिरोली जिल्हा समितीच्या वतीने आज १९ फेब्रुवारी रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात २५ रक्तदात्यांनी पुढाकार घेत रक्तदान केले.
आज १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आरमोरी तालुक्यातील जोगीसाखरा येथे स्वयं रक्तदाता गडचिरोली जिल्हा समितीच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात चेतन सहारे, स्वप्नील नारनवरे, यशवंत राऊत, कैलास खरकाटे, गणेश शेंडे, शुभम खरकाटे, विजय आखरे, उमेश पत्रे, प्रफुल धोटे, अश्विन गरफडे,अतुल उईके, जितेंद्र ठाकरे, पांडुरंग ढोरे, नेताजी ठाकरे, चेतन चौधरी, सागर मने, चंदू बेहरे, कमलेश ठाकरे, लोचन मोहुर्ले, राजू खरकाटे, राकेश गुरनुले, अभिषेक चौधरी, वैभव ठेंगरी, मंगेश ढोरे, शैलेश ढोरे या २५ रक्तदात्यांनी पुढाकार घेत रक्तदान केले.
यावेळी स्वयं रक्तदाता जिल्हा समितीचे अध्यक्ष चारुदत्त राऊत, उपाध्यक्ष निशिकांत नैताम, कोषाध्यक्ष आकाश आंबोरकर, समितीचे इतर सदस्य, वैद्यकीय अधिकारी कमर्चारी आदी उपस्थित होते.