– लवकरच कारवाईचा बडगा उगरण्यात येणार
The गडविश्व
पुणे : राज्यात टीईटी घोटाळा प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी आता बोगस 7 हजार 900 शिक्षकांची यादी पत्त्यांसह तयार करण्यात आली असल्याची खळबळजनक माहिती उघड झाली असून ही यादी पडताळणीसाठी शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आल्याचे कळते. याप्रकरणी आता पुणे पोलिसांकडून लवकरच कारवाईचा बडगा उगरण्यात येणार आहे. त्यामुळे बोगस शिक्षकांचे धाबे दणाले आहेत.
बोगस 7,900 शिक्षकांची पत्त्यांसह यादी तयार झाली आहे. अपात्र उमेदवारांविरुद्ध कारवाईसाठी पुणे सायबर पोलीस तयार आहेत. अपात्र उमेदवारांच्या मूळ गुणांमध्ये वाढ करुन पास केले गेले. 28 मार्क असताना अंतिम निकालात 82 मार्क्स दिल्याचे उघड झाले आहे. यादी पडताळणीसाठी शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आली आहे. आता खातरजमा झाल्यानंतर अपात्र उमेदवारांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे.