– आरोग्य सेवा वाऱ्यावर
The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, १७ जुलै : तालुक्यातील रांगी येथे परिसरातील अनेक गावाना आरोग्य सुविधा पुरवण्याकरिता तयार केलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या छतातुन पाणी टिपकत असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे आरोग्य केद्राच्या बांधकामावर प्रश्न चिन्ह निर्माण होत असुन याचा परिणाम रुग्णांवर व आरोग्य कर्मचाऱ्यांवर होताना दिसत आहे.
धानोरा तालुका मुख्यालयापासून १८ किमि अंतरावर असलेल्या रांगी प्राथमिक आरोग्य केंद्राची मुख्य इमारत जुनी असल्याने असल्याने जिर्ण झाली असुन संपूर्ण छताला गळति लागली आहे. तर इमारतीला भेगा ही पडलेल्या दिसतात. अशा परिस्थितीत रुग्णांवर उपचार कसा करायचा असा प्रश्न डॉक्टरसह सर्वानाच पडलेला आहे. रुग्णालयाच्या मुख्य इमारतीचा संपुर्ण भाग पाण्याने गळत आहे. त्यामुळे सदर इमारत धोकादायक आहे परंतु याकडे मात्र शासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होताना दिसुन येत आहे. या व्यतिरिक्त नव्याने बांधलेले व रिपेरिग केलेले पुरुष वार्ड, समहिला वार्ड, मिटीग हॉल यात सुद्धा छतावरुण पाणी गळत आहे त्यामुळे रुग्णांवर उपचार कुठे करायचा ? रुग्णाला भरती कसे करायचे ? असा प्रश्न साहजीकच निर्माण होत आहे. डॉक्टरच्या कॅबिनमध्ये बसता येणेही शक्य नसल्याने येथील डॉक्टरांनी आपले ठिकाण सध्या वऱ्हांड्यातच हलविलेले आहे. मुळ इमारत सोडली तरी इतर इमारत नव्यानेच बाधले आहे. तसेच वांरवार इमारतीची डागडुगी करुणही गळतिचे प्रमाण कमी झालेच नाही. मुख्य इमारत जिर्ण झाली असुन तिला भेगा पडलेल्या आहेत. छतातुन पाणी गळति चालु आहे. जिर्ण झालेली इमारत वेळीच निर्लेखित करुण काम करणे आवश्यक आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र सध्यातरी निकामी झालेले आहे. सदर इमारत नव्याने बांधण्यात यावे शी नागरिकांची मागणी आहे.