The गडविश्व
गडचिरोली : जिल्ह्यातील टीव्ही रिऍलिटी शो विजेत्या मनीषा मडावी यांचा फुले शाहू आंबेडकर ओबीसी महिला पर्व तिसरे साहित्य संमेलन २०२२ चंद्रपूर येथे ‘फिनिक्स’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
काल रविवार ८ मे रोजी चंद्रपूर येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कन्नमवार सभागृह येथे फुले शाहू आंबेडकर ओबीसी महिला साहित्य संस्कृती संवर्धन समिती मार्फत तिसरे फुले शाहू आंबेडकर ओबीसी महिला साहित्य संमेलन २०२२ चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून साहित्यिक, संपादिका अरुणा साबाने होत्या तसेच प्रमुख पाहुणे म्हणून अँड। अंजली साळवे, डॉ. प्रा. लक्ष्मण जाधव तसेच इतर मंडळी उपस्थित होते. यावेळी गडचिरोली जिल्ह्यातील मिसेस इंडिया, मिसेस महाराष्ट्र, टीव्ही रिऍलिटी शो विजेत्या तसेच वेगवेगळ्या सौन्दर्य स्पर्धेत जिल्ह्याचे नाव देशपातळीवर उंचावल्याबद्दल मनीषा मडावी यांचा ‘फिनिक्स’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्यांना हा पुरस्कार मिळाल्याने पुन्हा त्यांच्या यशाच्या कारकिर्दीत भर पडली आहे. अनेक स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.