टी 20 विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर

196

The गडविश्व
नवी दिल्ली : आयसीसीने टी 20 विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यंदा ही स्पर्था ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात पार पडणार आहे. यात भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, अफगानिस्तान हे संघ आधीच पात्र ठरले आहेत तर श्रीलंका, नामिबिया, वेस्ट इंडिज आणि स्कॉटलंड हे चार संघ 16 ऑक्टोबरपासून पात्र ठरण्यासाठी खेळतील. यामधून निवडलेल्या दोन संघांना सुपर 12 मध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे.
टीम इंडिया विश्वचषकातील आपल्या अभियानाला 23 ऑक्टोबरपासून सुरुवात करेल. पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध असणार आहे. मेलबर्नच्या मैदानावर भारत आणि पाकिस्तान 23 ऑक्टोबरला एकमेकांसमोर असतील. याआधी टी 20 विश्वचषकात भारत पाकिस्तान 2021मध्ये भिडले होते. त्या सामन्यात पाकिस्तानने भारताला पराभूत केले होते.

या तारखांना होतील टीम इंडियाचे सामने

– भारत विरुद्ध पाकिस्तान, 23 ऑक्टोबर (मेलबर्न)
– भारत विरुद्ध ग्रुप ए रनर-अप, 27 ऑक्टोबर (सिडनी)
– भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका, 30 ऑक्टोबर (पर्थ)
– भारत विरुद्ध बांग्लादेश, 2 नोव्हेंबर (एडिलेड)
– भारत विरुद्ध ग्रुप बी विजेता, 6 नोव्हेंबर (मेलबर्न)

टीम इंडियाला पाकिस्तान, बांग्लादेश, दक्षिण आफ्रिका आणि अन्य दोन क्वालिफायर टीमसह ग्रुप-2 मध्ये ठेवले आहे.

ग्रुप-1: इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, अफगानिस्तान आणि अन्य दोन क्वालिफायर
ग्रुप-2: भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांग्लादेश आणि अन्य दोन क्वालिफायर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here