ट्विटरबाबत इलॉन मस्क यांची मोठी घोषणा

391

The गडविश्व
मुंबई : टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांनी सोशल मीडिया ॲप ट्वीटर विकत घेतल्यानंतर ट्वीटरमध्ये काही बदल होतील असे आधीच बोलले जात होते. आता त्यात हळूहळू बदल होऊ लागले आहे. इलॉन मस्क यांनी ट्विट करत म्हटले आहे की ट्विटर इंक व्यावसायिक आणि सरकारी वापरकर्त्यांकडून नाममात्र शुल्क आकारू शकते. मात्र, सामान्य यूजर्ससाठी ट्वीटर नेहमीच फ्री असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

एलोन मस्क गेल्या महिन्यापासून ट्विटरवर अनेक बदल सुचवत आहेत. नुकतीच कंपनी विकत घेतल्यानंतर, मस्क यांनी सांगितले की त्यांना नवीन फीचर्ससह कंपनीला पुढे न्यायचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here