The गडविश्व वर्धा : ड्रममध्ये ठेवलेल्या डिझेलची चोरी करणाऱ्या चोरट्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने मुसक्या आवळल्या आहे. या प्रकरणी दिलीप शारावजी राऊत ४० रा. धामणगाव ता.हिंगणघाट जि. वर्धा व कृष्णा उर्फ छोटू मोहनराव वाघाडे २८ रा.धामणगाव ता.हिंगणघाट जि. वर्धा यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ७० लिटर डिझेल किंमत ७४३९ रुपये, दोन प्लास्टिक कॅन प्रतिकॅन किंमत ५०० रुपये प्रमाणे १००० रुपये, एक बजाज प्लॅटिना कंपनीची एम.एच.३२ एडी ०३६३ क्रमांकाची दुचाकी किंमत ३०,००० अस एकूण ३८, ४३९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, शशांक जगन्नाथ झिंगे रा. पिंपळगाव रोड, हिंगणघाट हे उमरी रॉड येथील यशवंत शिंदे यांचे क्रेशर गिट्टीखदानांवर दिवणजी म्हणून काम करतात. ते काम कंपनीमध्ये पोकलँड, क्रेशर मशीन जनरेटर, टिप्पर असल्याने कंपनीमध्ये नेहमी डिझेलची आवश्यकता असल्याने ते डिझेल ड्रममध्ये भरून कंपनीच्या आतील शेडमध्ये ठेवत असत . १८ मार्च रोजी अज्ञाताने दुचाकीच्या साहायाने शेडमध्ये ठेवून असलेल्या डिझेल पैकी ७० लिटर डिझेल चोरून नेल्याचे निदर्शनास आले. दरम्यान शशांक झिरे यांनी याबाबत पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे तक्रार दाखल केली व अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर गुन्हयाची तात्काळ दखल घेऊन गोपनीय माहितीच्या आधारे वरील नमूद आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कारवाई अपर पोलीस अधीक्षक शप्रशांत होळकर, अपर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंखे, उपविभागिय पोलीस अधिकारी, हिंगणघाट दिनेश कदम यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संपत चव्हाण यांच्या निर्देशानुसार पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ टापरे व गुन्हे प्रकटीकरण पथकातिल पोलीस अंमलदार विवके बनसोड, पंकज घोडे, प्रशांत वाटखेडे, उमेश बेले यांनी केली.
- ६ लाख १८ हजार २३६ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
The गडविश्व
गडचिरोली, दि. २१ : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी गडचिरोली जिल्ह्यातील तीन मतदार संघात...