The गडविश्व
गडचिरोली : आरमोरी तालुक्यातील डोंगरगाव/ठाणेगांव येथील रक्तदाता ओमकार भोलेनाथ नारदेलवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांचे डॉ. के. टी. किरणापुरे यांनी १४ फेब्रुवारी रोजी सांत्वन करून आर्थिक मदत केली.
आरमोरी तालुक्यातील डोंगरगाव/ठाणेगांव येथील रक्तदाता ओमकार भोलेनाथ नारदेलवार यांचे जानेवारी महिन्यात विद्युत खांबावरून पडून अपघाती निधन झाले. त्यामुळे नारदेलवार कुटुंबावर दुःखाचे पहाड कोसळले. या दुःखातून सावरण्यासाठी के. टी. किरणापुरे यांनी नारदेलवार कुटुंबाचे सांत्वन करून ओमकार नारदेलवार यांच्या आई वनिता नारदेलवार अणि वडील भोलेनाथ नारदेलवार यांना रोख एक हजार रुपये सुपूर्द केले. याप्रसंगी चारूदत्त राऊत , प्रा. जी. पी. जुआरे व नातेवाईक प्रामुख्याने उपस्थित होते.