The गडविश्व
गडचिरोली : महाराष्ट्र शासनाच्या साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने शिक्षणशास्त्रासाठी देण्यात येणारा कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार गडचिरोली जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्या तथा सर्चच्या डॉ. राणी बंग यांना प्रदान करण्यात आला आहे.
डॉ. राणी बंग यांनी स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र पदवी धारण केली असून एम.पी.एच पदवी यूएसए येथील जॉन हॉपकिन्स विद्यापीठातून प्राप्त केली आहे. १९८६ पासून गडचिरोली या आदिवासीबहुल जिल्ह्याच्या ठिकाणी डॉ. राणी बंग यांचे वैद्यकीय सेवा कार्य सुरु आहे. दारूबंदी चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग राहिला असून लैंगिकता शिक्षण प्रसारासाठी संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी शिबिरांचे आयोजन केले आहे. त्यांनी ‘ ग्रामीण स्त्रीचे प्रजनन आरोग्य’ या विषयांवर आंतरराष्ट्रीय पातळीवर संशोधन केले आहे. त्यांच्या तारुण्यभान पुस्तकाला महाराष्ट्र शासनाने कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार देऊन डॉ. राणी बंग यांचा गौरव केला आहे.