The गडविश्व
ता.प्र / धानोरा : श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचलित श्री जीवनराव सिताराम पाटील मुनघाटे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग प्रमुख डॉ। संजय जनार्दन मुरकुटे यांनी गोंडवाना विद्यापीठ अंतर्गत नॉमिनेटिव्ह स्टडी ऑफ हेल्थ रिलेटेड फिजिकल फिटनेस ऑफ स्टुडंट्स ट्रायबल एरियास या विषयावर संशोधनाचे कार्य पूर्ण करून डॉ. महेश चंद्र शर्मा गुरुनानक सायन्स कॉलेज बल्लारपूर यांच्या मार्गदर्शनात आचार्य पदवी संपादन केलेली आहे. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा शालिनीताई रमेशचंद्र मुनघाटे, कार्याध्यक्ष आशिताई रोहनकर, सचिव मीनल सहानी तसेच प्राचार्य डॉ. पंकज चव्हाण यांच्यासह सर्व प्राध्यापक प्रशासकीय कर्मचारी आप्तस्वकीय मित्रपरिवार यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला असून त्यांनी केलेल्या संशोधन कार्यामुळे परिसरातील संशोधक विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल असा आशावाद सर्व शुभेच्छुकानी व्यक्त केला आहे.