– गावातील नागरिकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याची अनेक वर्षांपासूनची परंपरा कायम
The गडविश्व
चिमूर : तालुका मुख्यालयापासून १५ किमी अंतरावर असलेल्या मानेमोहाळी येथे गावातील नागरिकांच्या हस्ते ग्रामपंचायतीतील ध्वजारोहण करण्याची अनेक वर्षांपासूनची कायम आहे. हीच परंपरा कायम ठेवत आज महाराष्ट्र दिनी ग्रामपंचायतीतील ध्वजारोहण गावातील तरुण युवक चेतन राणे याच्या हस्ते करण्यात आले.
मानेमोहाळी हे छोटेसे गाव गटार मुक्त गाव, पेपरलेस ग्रामपंचायत, ग्राम स्वच्छतेच्या पुरस्काराने चिमूर तालुक्यात प्रसिद्ध आहे. येथील ग्रामपंचयातीची अनेक वर्षांपासूनची परंपरा आजही कायम आहे. येथील विद्यमान सरपंच राजेंद्र करारे यांच्या संकल्पनेतून २६ जानेवारी, १५ ऑगस्ट, १ मे रोजीचा ग्रामपंचायतीतील ध्वजारोहण सोहळा गावातीलच एका नागरिकाच्या हस्ते करण्याची परंपरा मागील अनेक वर्षांपासून कायम आहे. हीच परंपरा पुढेही चालू रहावी अशी इच्छाही सरपंच राजेंद्र करारे यांनी व्यक्त केली आहे. आज महाराष्ट्र दिनी गावातील तरुण युवक चेतन राणे याच्या हस्ते ग्रामपंचायत मधील ध्वजारोहण करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, लिपिक, सदस्यगण, शिपाई, तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.