– छल्लेवाडा येथे भव्य कार्यकर्ता मेळावा संपन्न
The गडविश्व
अहेरी, २० नोव्हेंबर : गडचिरोली जिल्हा हा अतिदुर्गम व नक्षलग्रस्त असून जिल्ह्यातील तळागाळातील गोरगरिबांना शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवुन देण्यासाठी आपण तत्पर आहोत असे प्रतिपादन जि.प. माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केले.
ते अहेरी तालुक्यातील रेपनपली ग्राम पंचायत हद्दीतील छल्लेवाडा येथे १९ नोव्हेंबर रोजी भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते उदघाटन स्थानावरून बोलत होते.
यावेळी परिसरातील कानाकोपऱ्यातून आदिवासी विद्यार्थी संघाचे कार्यकर्ते एकत्र आले होते. आदिवासी विद्यार्थी संघाचे काम हाताळण्यात व शासनाची विविध विकास कामे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या तालुक्यातील दुर्गम भागातील कार्यकर्त्याच्या मोलाचा वाटा असून याचे आम्हाला अभिमान असून जिल्ह्यातील व तालुक्यातील सर्व शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्यक्ष शेवटच्या नागरिकांना मिळतो की नाही याची माहिती पोहोचवून त्यांना त्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी तत्पर आहोत, वेळ देऊन संघटनेच्या काम समोर वाढवित आहेत हे त्यांचे काम कौतुकास्पद आहे. शासनाच्या योजनांचा लाभ मिळाले की नाही , त्यांना योजनेचा लाभ कसा मिळवून देता येईल यासाठी प्रयत्न करावे व स्वत पुढाकार घ्यावा व संघटन तालुक्यातील ग्रामीण परिसरात वाढविण्यासाठी परिश्रम घ्यावा असे सांगतांना गेल्या अनेक वर्षांपासून मी गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात अविस संघटनेचा काम करीत आहे सर्वांना काम करतांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत असतो परंतु संघटने सोबत नागरिकांना सुद्धा वेळ देणे गरजेचे आहे व जिल्ह्यातील व तालुक्यातील सर्वसामान्य गोरगरीब जनतेपर्यंत सरकारच्या योजना पोहचवण्यासाठी पुढाकार घ्यावा असे मार्गदर्शन करत असताना जिल्हा परिषदे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार म्हणाले.
पुढे बोलतांन छल्लेवाडा गावात सुंदर रस्ते झाले आहेत, या क्षेत्रांतून प्रथम जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडुन आलो तेंव्हा काय परिस्थिती होती, आज या गावामध्ये जे सोईसुविधा आहेत ते आपण केलेले आहेत आज पर्यंत केलेले कामे कुठे गेले अशीच खळबळ
जनक प्रश्न केले असून या क्षेत्रांतून निवडून आलो नसलो तरी आम्हाच्या उमेदवाराला या क्षेत्रातून निवडुन दिले त्यामुळे मी जि.प.अध्यक्ष बनलो व जिल्हात व तालुक्यात सर्वाधिक निधी या रेपनपली-उमानूर क्षेत्रात देण्यात आले असून आज विकासाचे कामे दिसत आहेत, त्यात आरोग्य, शिक्षण, पाण्याच्या समस्या असेल व वैयक्तिक अडीअडचण असेल आपण नेहमी मदत केली असून येणाऱ्या काळात आपण नेहमी तुम्हाच्या सोबत उभे राहण्यासाठी तत्पर आहोत अशी ग्वाही दिली.
यावेळी मंचावर अध्यक्ष म्हणून रेपनपलीचे सरपंचा सौ.लक्ष्मी मडावी तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभापती भास्कर तलांडे, माजी सभापती सौ.सुरेखा आलाम, माजी जि.प.सदस्य अजय नैताम, नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, राजारामचे सरपंच नागेश कन्नाके, उपसरपंच सौ.सुरक्षाताई आकदर, कमलापूरचे सरपंच श्रीनिवास पेंदाम, उपसरपंच सचिन ओल्लेटीवार, सामाजिक कार्यकर्ते अँड.एच.के.आकदर, डॉ.आर मानकर एटापली आविस सचिव प्रज्वल नागूलवार, ग्राम पंचायत सदस्य लक्ष्मण कोडापे, महागाव ग्रा.प.सदस्य राजू दुर्गे, प्रणाली मडावी, पूजा रामटेके, इंदू पेंदाम, अभिलाषा डोंगरे, समया कोंडागूर्ले, आदि मंचावर होते.
कार्यक्रमाचे संचालन दुर्योधन यांनी केले तर आभार प्रदर्शन दासू कांबडे यांनी केली. या यशस्वी मेळावाचे आयोजन विलास बोरकर, गुलाब देवगडे, शंकर बासरकर, लक्ष्मण झाडे, राहुल सुंदिला, अशोक झाडे, वागू निमगडे,लक्ष्मण जनगाम,मनोहर बासरकर,रवि दुर्गे, वैकुंटम आकुदारी, नागेश ताटिपेली, महेश भगत, हनमंतू ठाकरे, प्रशांत गुरनूले, श्रीनिवास लेंडगुरे, मोंडी कोटरंगे, स्वामी ठाकरे, वसंत चव्हाण, विलास सिडाम, वासुदेव सिडाम,सुरेश ठाकरे,किष्टाया गुरनूले,नारायण कोटरंगे, श्रीहरी गुरजाला, रवि चव्हाण, रवि सोतकु, रजित सभावा, सुरेश चव्हाण आदि परिश्रम घेतले. या मेळाव्याला परिसरातील पुरुष-महिला व युवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.