तळोधी मोकासा येथील दोन विक्रेत्यावर गुन्हा दाखल

28

-२५ हजाराची मोहफुल- विदेशी दारू जप्त
The गडविश्व
गडचिरोली, दि. २३ : चामोर्शी तालुक्यातील तळोधी मोकासा या गावाला अवैध दारूविक्रीमुक्त करण्यासाठी महिलांनी शर्तीचे प्रयत्न सुरु केले आहे. त्यामुळे मागील सात महिने गावातून अवैध दारू पूर्वीच्या तुलनेत अनेक पटीने कमी झाली आहे. परंतु, गावातील काही विक्रेत्यांनी चोरट्या मार्गाने अवैध व्यवसाय सुरु केल्याची माहिती मिळताच मुक्तिपथ व गाव संघटनेच्या महिलांनी अहिंसक कृती करीत २५ हजार रुपये किमतीची मोहफुलाची व विदेशी दारू जप्त केली. याप्रकरणी एका महिलेसह दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले.
हे गाव मुख्यालयापासून १० किमी अंतरावर आहे. या ठिकाणी १५ ते २० दारू विक्रेते सर्रास दारू विक्री करीत होते. अवैध दारूविक्रीला कंटाळून महिलांनी ग्रामसभा घेऊन दारूविक्रीबंदीचा ठराव पारित केला. तसेच सर्व दारूविक्रेत्यांना नोटीस देऊन अवैध व्यवसाय तत्काळ बंद करण्याची तंबी देण्यात आली. यामुळे काही दारू विक्रेत्यांनी दारूविक्री बंद केली. परंतु काही मुजोर विक्रेत्यांनी आपला अवैध व्यवसाय सुरूच ठेवला. त्यामुळे गाव संघटनेने आतापर्यंत १२ दारूविक्रेत्यांना पडकून पोलिसांच्या स्वाधीन केले. यामुळे सदर गाव गेल्या सात महिन्यांपासून अवैध दारूविक्रीमुक्तीच्या मार्गावर आहे.
दरम्यान, ८ ऑक्टोबर रोजी पुन्हा गावात आयोजित मासिक बैठकीत दारू विक्रेत्यांना बोलावून यापुढे दारूविक्री केल्यास १० हजार रुपये दंड वसूल करण्याची तंबी दिली. तरीसुद्धा गावातील विक्रेत्याने दारूविक्री सुरू केल्याची बाब लक्षात येताच मुक्तिपथचे तालुका उपसंघटक आनंद सिडाम यांनी महिलांना अहिंसक कृतीचा सल्ला दिला. दरम्यान, गावातील महिलांनी अहिंसक कृती करण्याचे नियोजन केले. त्यानुसार २१ ऑक्टोबर रोजी चामोरशी पोलीस, गाव संघटना व मुक्तिपथने संयुक्त कृती करीत २५ हजार रुपये किमतीची मोहफुलाची व विदेशी दारू जप्त करीत श्रीकृष्ण अनिल गव्हारे व एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी पोलिस विभागाचे कर्मचारी, मुक्तिपथचे तालुका संघटक आनंद इंगळे, आनंद सिडाम , गाव संघटनेचे रेखा कुनघाडकर, ललिता मेश्राम, संगीता भोयर, सरूबाई कुनघाडकर, उष्टाबाई किरमे, मीराबाई किरमे, मायबाई भोयर., मीराबाई टिंगूसले, ज्ञानेश्वरी बुरांडे, शोभा गेडाम, पुष्पाबाई मेकलवार, लक्ष्मी शेरकी. मंगला गेडाम, निळा मेकलवार. काजल चिचघरे, विमल गेडाम, सखुबाई कुकडकार, अनुसया शेंडे, ममता मेश्राम, मीनाश्री भोयर, शब्बूबाई गणवीर, विमल वासेकर उपस्थित होते.

(#thegdv #thegadvishva #muktipath #gadchirolinews )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here