ताडोबातील बोटेझरी कॅम्प मधील सहा हत्ती गुजरातला रवाना

358

– वन्यप्रेमींमध्ये नाराजी, विरोधाला अपयश
The गडविश्व
चंद्रपूर : जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बोटेझरी हत्तीकॅम्प येथील ४ नर व २ मादी असे सहा हत्ती आज गुरुवार १९ मे रोजी सकाळच्या सुमारास गुजरात राज्यातीलअहमदाबाद जवळील जामनगर येथील राधे क्रिष्णा टेंपल, एलिफंट वेलफेअर ट्रस्ट येथे सहा वाहनातून स्थलांतरित करण्यात आले आहे. यामुळे वन्यप्रेमींमध्ये नाराजीचा सूर असून दर्शविण्यात आलेल्या विरोधाला अपयश आल्याचे दिसून येत आहे.
सदर हत्ती योग्य स्वास्थ, उच्च दर्जाच्या वैद्याकीय देखरेखीसाठी ताडोबातून गुजरात येथे हलविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ.जितेंद्र रामगावकर यांनी येथे प्रसिध्दला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की राज्यातील बंदिस्त हत्तीच्या उत्तम आरोग्यासाठी व व्यवस्थापनासाठी वन विभाग कटीबध्द आहे. याकरिता विविध तज्ञ व या क्षेत्रातील मान्यताप्राप्त अशासकीय संस्थांचा सहयोग घेण्यात येत आहे. सहाही हत्ती एकाच वंशावळीचे असल्यामुळे भविष्यात येणाऱ्या संततीमध्ये गंभीर स्वरूपाचे दोष उद्भवण्याची शक्यता होती. त्यामुळे हत्तींना अन्यस्थळी स्थलांतरीत करण्याबाबत वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्यात आला. राज्य शासनाने हत्तीच्या पुढील जीवनकाळातील योग्य स्वास्थ व उच्च दर्जाचे वैद्यकीय देखरेखीसाठी, अनुभवी पशुवैद्यकीय अधिकारी यांचे मार्फत उचाराची सोय उत्तम आधुनिक सेवा सुनिश्चित करण्यासाठी प्रशस्त व भरपूर जागा असलेल्या जामनगर स्थित राधे क्रिष्णा टेंपल, एलिफंट वेलफेअर ट्रस्ट, येथे सहा हत्तींना स्थलांतरीत केले. यासाठी प्रोजेक्ट एलिफंट विभाग, केंद्रीय प्राणी संग्रहालय, पर्यावरण, वने आणि हवामान बदल यांच्याकडून नाहरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर हे हत्ती आज सकाळी जामनगरच्या दिशेने रवाना झाले.
मुख्य वनसंरक्षक वन्यजीव विभाग गुजरात यांच्याकडून देखील यासाठी नाहरकत प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. आज सकाळी ताडोबात राधे क्रिष्णा टेंपल, एलिफंट वेलफअर ट्रस्टचे पशुवैद्यकीय अधिकारी तथा महावत दाखल झाले. सहा वाहनातून हे सर्व हत्ती बोटेझरी कॅम्प येथून नागपूर मार्ग जामनगर येथे रवाना झाले. केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाच्या दबावातच हे हत्ती गुजरात येथे पाठविण्यात आल्याची ओरड आता वन्यजीव प्रेमी करित आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here