The गडविश्व
मुंबई : चंद्रपूरातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा विस्तार करताना कोळसा येथील 49 कुटुंब व बोटेझरी येथील 79 कुटुंब असे एकूण 128 कुटुंबाचे पुनर्वसन भगवानपूर येथे करण्यात आले असून या कुटुंबांना 18 नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यात 47 हजार रूपये प्रती कुटुंब प्रोत्साहनात्मक रक्कमेसोबत जनावरांच्या गोठ्यासाठी प्रती कुटुंब 58 हजार रूपये अदा करण्यात आले आहे. वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी 13 हजार रूपये ताडोबा-अंधारी व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठानामधून देण्यात आले असल्याचेही वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधान परिषदेच्या प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
भगवानपूर येथील लाभार्थ्यांना यापूर्वी वाटप करण्यात आलेल्या शेत जमिनीव्यतिरिक्त प्रती कुटुंब 2 हेक्टर शेत जमीन वाटप करण्यात आली आहे. त्याचबरोबर भगवानपूर येथील इको विकास समितीस डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेंतर्गत 25 लाख रूपये आणि व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठानअंतर्गत 5 लाख रूपये अदा करण्यात आले असल्याचेही भरणे यांनी सांगितले.
यासंदर्भात प्रश्न विधान परिषद सदस्य रामदास आंबटकर यांनी उपस्थित केला होता.