The गडविश्व
सावली, २० नोव्हेंबर : तालुक्यातील प्रवीणभाऊ आडेपवार माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालय निफांद्रा १७ नोव्हेंबर पासून २३ नोव्हेंबर २०२२ पर्यंत विविध शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यात एकल आणि सांघिक स्पर्धा सुरू आहेत.
१९ वर्षे वयोगटाखालील कबड्डी स्पर्धेत विश्वशांती उच्च माध्यमिक विद्यालय सावली विरुद्ध रमाबाई आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय सावली या संघात अंतिम सामना झाला. हा अंतिम सामाना खूप रोमहर्षक होईल असे बघनाऱ्याचे अंदाज होते,परंतु सुरुवाती पासूनच विश्वशांतीच्या संघाने आघाडी कायम ठेवून रमाबाई आंबेडकरच्या संघावर वर्चस्व निर्माण केले . शेवटी ०७ गुणांची आघाडी घेऊन या सामन्याचा निकाल विश्वशांती उच्च माध्यमिक विद्यालय सावली च्या बाजूने लागला.
विजयी संघात राहिल शेख , जयंत गुरूनुले , सुरज बोरकुटे , गणेश कोसरे , पियुष कोसरे , राहील घोगरे , अंकुश गुरनुले आणि गणेश गेडेकर इत्यादी विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
प्रशिक्षक संजय गाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने विजय साकार केला. विजयी संघाचे विश्वशांती उच्च माध्यमिक विद्यालय सावलीचे मुख्याध्यापक आर.एस.मुप्पावार यांनी अभिनंदन केले.
saoli, vishwashanti school, nifandra