तेंदुपत्ता वाहतुक करणाऱ्या ट्रक ला आग : आगीत ट्रक जळून भस्मसात

1038

– मुरमाडी- गिलगाव मार्गावरील घटना
The गडविश्व
गडचिरोली : जिल्हयात तेंदुपत्ता हंगाम सुरू आहे. तेंदुपत्ता वाहतुक करणाऱ्या ट्रकला अचानक आग लागल्याने या आगीत संपुर्ण ट्रक जळून खाक झाल्याची घटना काल २८ मे रोज दुपारी २ वाजताच्या सुमारास मुरमाडी-गिलगाव मार्गावर घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवीतहाणी झाली नाही.
प्राप्त माहितीनुसार, रांगी येथील तेंदुफळावरील तेंदुपत्ता गोळा करून ट्रक चातगाव मार्गे गडचिरोलीकडे येत होता. दरम्यान मुरमाडी-गिलगाव मार्गावर अचानक ट्रक ला आग लागली. ट्रक चालकाने प्रसंगावधान राखत वाहनातून खाली उतरला. पाहता पाहता काही क्षणातच आगीने उग्ररूप धारण केले. सदर घटनेची माहिती गडचिरोली नगर परिषदेला देण्यात आली असता अग्निशमन वाहन घटनास्थळी पोहचले व काही वेळात आग नियंत्रणात आणण्यात आली. मात्र तोपर्यंत ट्रकसह वाहनातील लाखो रूपयांचा तेंदुपत्ता जळून राख झाला. यात तेंदुपत्ता कंत्राटदाराचे मोठया प्रमाणात नुकसान झाले.
वाढत्या उष्णतेमुळे आग लागण्याच्या घटना घडत आहे. मागील काही दिवसातपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातुन आग लागण्याच्या घटना घडल्याच्या उघडकीस आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here