तेंदूपत्ता संकलनाकरिता गेलेल्या मजुरांवर रानडुकरांच्या कळपाचा हल्ला : दोघेजण गंभीर जखमी

852

-मसेली जंगल परिसरातील घटना
The गडविश्व
गडचिरोली : जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या व छत्तीसगढ राज्याच्या सीमेलगत असलेल्या कोरची तालुक्यातीळ मसेली जंगल परिसरात तेंदूपत्ता संकलनाकरीता गेलेल्या मजुरांवर रानडुकरांच्या कळपाने हल्ला चढवला यात दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवार ८ मे रोजी घडली. स्मिता अशोक जांभुळकर (४५) रा.मसेली व केशव कैलास मेश्राम (२५) रा. सावली असे गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत.
कोरची तालुक्यात मागील ५ दिवसांपासून तेंदूपत्ता हंगामाला सुरुवात झाली आहे. काल नेहमी प्रमाणे सकाळीच अनेक मजूर मसेली लगतच्या डोंगरगाव तेंदूपत्ता संकलणाकरिता गेले होते. दरम्यान रानडुकराच्या कळपाने जांभुळकर व मेश्राम यांच्यावर हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले. परिसरातील मजुरांनी आरडाओरड केल्याने डुकरांच्या कळपाने पळ काढला. जखमींना कोरची ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र जखमींची स्थिती गंभीर असल्याने केशव मेश्राम यांना गडचिरोली तर स्मिता जांभूळकर यांना गोंदिया येथे पुढील उपचाराकरिता रेफर करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here