दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार

350

The गडविश्व
मुंबई : दहावी, बारावीच्या परीक्षांबाबत शिक्कामोर्तब झाला असून परीक्षा ऑफलाईनच होणार असल्याची माहिती राज्य शिक्षण मंत्रिमंडळाने पत्रकार परिषदेत दिली. तसेच दहावी आणि बारावीची परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली
दहावी, बारावीच्या परीक्षा बदल आज निर्णय होणार होता. परीक्षा हि ऑनलाईन की ऑफलाईन होणार यावर संभ्रम कायम होता. आता हा संभ्रम दूर झाला असून परीक्षा ऑफलाईनच होणार आहेत. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत या संबंधित माहिती दिली आहे. बारावीची लेखी परिक्षा 4 मार्च ते 30 मार्च दरम्यान ऑफलाईन होणार आहे. प्रॅक्टिकल आणि तोंडी परिक्षा 14 फेब्रुवारी ते 3 मार्चपर्यंत दरम्यान घेण्यात येणार आहे तर कोरोनामुळे जे विद्यार्थी तोंडी किंवा लेखी परीक्षा देऊ शकणार नाहीत त्यांना 31 मार्च ते 18 एप्रिल या दरम्यान परीक्षा देण्याची संधी देण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here