– विद्यार्थ्यांना वार्षिक परिक्षेकरीता जिल्हाधिकारी यांच्याकडून शुभेच्छा
The गडविश्व
गडचिरोली : इयत्ता 12 वी व इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांची वार्षिक प्रमाणपत्र परिक्षा मार्च- एप्रिल -2022 मध्ये होत आहे. इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्यांची परिक्षा ही 04 मार्च पासून सुरु होत असून 30 मार्च 2022 पर्यंत असेल. परिक्षा दोन सत्रांमध्ये असून सकाळचे सत्राची वेळ ही 10.30 ते 2.00 वाजेपर्यंत असेल तर दुपारचे सत्र हे 3.00 ते 6.30 वाजेपर्यंत असेल. इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांची परिक्षा ही दिनांक 15 मार्च ते दि. 04 एप्रिलपर्यंत असून ही परिक्षा एकच सत्रामध्ये असून सकाळचे सत्राची वेळ ही 10.30 ते 2.00 वाजेपर्यंत असेल.
इयत्ता 12 वीच्या परिक्षा ही जिल्हयात एकूण 184 केंद्रामध्ये होत असून एकूण 13168 विद्यार्थी या परिक्षेला बसलेले आहे. तसेच 10 वी परिक्षा ही जिल्ह्यात एकूण 316 केंद्रामध्ये होत असून 14725 विद्यार्थी या परिक्षेला बसलेले आहेत. दिनांक ३ मार्च पर्यंत बोर्डाच्या परीक्षेसाठी विद्यार्थी अर्ज भरू शकत असल्याने या आकडेवारीमध्ये अजून वाढ होण्याची शक्यता आहे.
आज जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समितीची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी शिक्षणाधिकारी माध्यमिक आर पी निकम यांनी परीक्षेसंबंधी व तयारीबाबतची माहिती जिल्हाधिकारी यांना सादर केली. तसेच यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी 12 वी व 10 वीच्या परिक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी, गडचिरोली संजय मीणा यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत.