दारूच्या व्यसनातून मुक्त होण्याकरीता उपचार घेणे झाले सोयीस्कर

233

– दारूचे दुष्परिणाम कळताच ८६ रुग्णांनी घेतला उपचार
The गडविश्व
गडचिरोली१, १७ ऑगस्ट : मुक्तिपथ अभियानातर्फे बाराही तालुका मुख्यालयातील कार्यालयात नियोजित दिवशी व्यसन उपचार क्लिनिकचे आयोजन केले जात असल्यामुळे रुग्णांना उपचार घेणे सोयीस्कर झाले आहे. मागील आठवडाभरात विविध तालुक्यातील एकूण ८६ रुग्णांनी दारूचे दुष्परिणाम कळताच क्लिनिकला भेट देऊन उपचार घेतला आहे.
दारूचे व्यसन हे एक मानसिक आजार आहे. यातून मुक्त होण्यासाठी उपचार घेणे आवश्यक आहे. जिल्हाभरातील अशा रुग्णांना तालुकास्थळी उपचाराची सोय उपलब्ध करून देण्यासाठी १२ ही तालुक्यात व्यसन उपचार क्लिनिक सुरु करण्यात आले. यामुळे शहरी, ग्रामीण, दुर्गम व अतिदुर्गम भागातील रुग्णांना सुद्धा उपचार घेणे सुलभ झाले आहे. सोमवारी गडचिरोली ११, बुधवारी देसाईगंज १८, गुरुवारी एटापली ९, मुलचेरा ४, शुक्रवारी चामोर्शी ५, अहेरी १५, कुरखेडा ९ व सिरोंचा १५ अशा एकूण ८६ रुग्णांनी दारूच्या व्यसनातून मुक्त होण्यासाठी पुढाकार घेतला आहे. तालुकास्थळावरील क्लिनिकला भेट दिलेल्या रुग्णांवर उपचार करीत त्यांना समुपदेशन सुद्धा करण्यात आले. यामुळे रुग्णांना व्यसनातून मुक्त होण्यासाठी मदत होणार आहे. जिल्हयातील रुग्णांनी जवळच्या तालुका क्लिनिकचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुक्तीपथ अभियानाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here