दारूमुक्तीसाठी संघर्ष करण्याची दर्शवली तयारी

139

– मेडपली येथील स्पर्धेत ४९ जणांचा सहभाग
The गडविश्व
गडचिरोली, १ एप्रिल : भामरागड तालुक्यातील मेडपली येथे दारू व तंबाखू मुक्तीसाठी मुक्तिपथ तर्फे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत ४९ स्पर्धकांनी सहभाग दर्शवित दारूमुक्तीसाठी संघर्ष करण्याची तयारी दर्शवली.
‘दारू व तंबाखू मुक्तीसाठी धावूया’ ही या मॅरेथॉन स्पर्धेची मुख्य थीम आहे. स्पर्धेच्या माध्यमातून गावाच्या दारू व तंबाखूमुक्तीसाठी गावातील सक्रीय युवक, महिला व पुरुष यांनी एकत्र यावे. या उद्देशाने मुक्तिपथ द्वारा गावातील संघटन सदस्याच्या सहकार्याने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमामध्ये पुरुष गट १२, महिला गट ११, युवक गट १४ व युवती गट १२ अशा एकूण ४९ स्पर्धकांनी सहभाग घेतला. या चारही गटातील पहिला व दुसरा क्रमांकाच्या स्पर्धकांना मेडल, प्रमाणपत्र व दुपट्टा देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी मुक्तिपथचे आबिद शेख यांनी ग्रामस्थांना दारू व तंबाखूच्या व्यसनामुळे होणारे दुष्परिणाम समजावून सांगितले. सोबतच अवैध दारूविक्री विरोधात लढा देण्यासाठी गावकऱ्यांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. यावेळी गावातील पाटील चिंना पुंगाटी , दौलत वडडे, आशाताई रुक्मि नैताम तसेच प्रतिष्ठित व्यक्ती पांडुरंग मज्जी, कोतवाल रामचंद्र आलाम उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन मुक्तीपथ स्पार्क कार्यकर्ती विद्या पुंगाटी यांनी केले.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (The gdv) (Muktipath) (Chandrpur News Updates) (Game of Thrones) (Lucknow Super Giants) ( Man City) (Bihar Board 10th Result 2023) (JioCinema) (Tata ipl 2023)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here