दारूविक्रीचा व्यवसाय बंद करण्याची विक्रेत्यांना केली विनंती 

153

– नांगपुर येथे ग्रापं व गाव संघटनेच्या वतीने जनजागृती रॅली 

The गडविश्व

गडचिरोली, २६ ऑक्टोबर : कोरची तालुक्यातील नांगपुर येथील अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी उपसरपंच यांच्या नेतृत्वात ग्रापं समिती व गाव संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. त्याअनुषंगाने ग्रामस्थांनी रॅली काढून ‘तुमचा अवैध व्यवसाय बंद करून दारूमुक्त गाव निर्माण करण्यासाठी सहकार्य करा’ अशी विनंती दारूविक्रेत्यांना करण्यात आली.

मुक्तीपथ अभियानाच्या मार्गदर्शनातून मुबंई अधिनियम दारुबंदी कायदा १९४९, पेसा कायदा १९९६ या काद्याचा आधार घेऊन गावातील अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी गावाला एकत्र आणून आत्मचिंन बैठक घेण्यात आली. मुक्तीपथ गाव संघटना पुनर्गठित करून पेसा गाव ग्रामसभा घेऊन अवैध दारूविक्री बंद करण्याचा ठराव घेण्यात आला. दारु विक्रेत्यांवर २५ हजाराचा दंड, विक्रेत्यांची माहिती देणाऱ्यांना १००० रुपये बक्षिस देणे, गावात दारु पिऊन भांडण करणाऱ्यांवर ५ हजार दंड ठोठावण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याअनुषंगाने कृती कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. त्यांनतर गावात रॅली काढून दारूमुक्त गाव निर्माण करण्याचा नारा देण्यात आला. अशातच निवडणुकीच्यावेळी ‘निवडून येण्यासाठी दारु वाटणार नाही, मतदानाच्या दिवसी दारु पाजणार नाही, जर माझ्या ग्रामपंचायतमध्ये निवडुन आलो किंवा नाही आलो तरी गावातील दारु बंदीला माझे सहकार्य राहील’ अशा वचननाम्याची आठवण करून ग्रापं उपसरपंच परमेश्वर लोहंबरे यांनी दारूमुक्त गाव निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून उपसरपंच लोहंबरे यांच्यासह ग्रामस्थांनी दारूविक्रेत्यांच्या घरोघरी जाऊन हात जोडून दारूविक्री बंद करण्याची विनंती केली. सोबतच पुन्हा दारू विक्री करतांना आढळून आल्या २५ हजारांचा दंड आकारण्यात येणार असल्याचीही माहिती दिली.  या रॅलीत उपसरपंच परमेश्वर लोहंबरे, मुक्तीपथ गावसंघटना अध्यक्ष शंकर गुरभेलीया, ग्रापं सचिव महेश्वरी भैसरा, मुक्तिपथ तालुका संघटिका निळा किन्नाके यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here