– सापळा कारवाई करत आरोपी ताब्यात, ४ लाख १३ हजारांचा मुद्दमाल जप्त
The गडविश्व
वर्धा : दारूची तस्करी होणार असल्याची माहिती हिंगणघाट पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकास मिळताच सापळा रचून चारचाकी वाहनासह ४ लाख १३ हजार ६०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई आज २१ मार्च रोजी करण्यात आली. याप्रकरणी आरोपी मनोज भारतलाल जैस्वाल (५४) रा. नेहरू वार्ड, हिंगणघाट याला ताब्यात घेवून दारूबंदी कायदयान्वये पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, हिंगणघाट पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटिकरण पथकास रात्रो़च्या सुमारास अवैध दारूची तस्करी होणार असल्याची गोपनिय माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटिकरण पथकाने सापळा कारवाईचे आयोजन केले असता. रेनॉल्ट क्विड कंपनीचे एमएच ३२ वाय ५०८६ क्रमांकाचे चारचाकी वाहन येतांना दिसले. सदर वाहनास थांबवून वाहनाची तपासणी केली असता वाहनामध्ये विदेशी दारूच्या ११ पेटया आढळून आल्या. याप्रकरणी मनोज भारतलाल जैस्वाल (५४) याविरूध्द पोलीस स्टेशन हिगणघाट येथे दारूबंदी कायदयांन्वये कारवाई करत दारू व जप्त वाहन असा एकुण ४ लाख १३ हजार ६०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाईमुळे अवैध दारू तस्करांचे धाबे दणाणले आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अपर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोनी संपत चव्हाण यांच्या निर्देशाप्रमाणे पोलीस अंमलदार शेखर डोंगरे, निलेश तेलरांधे, सचिन घेवंदे, सचिन भारशंकर, विशाल बंगाले यांनी केली.