-पिरमीडा गाव संघटनेचे पोलिस विभागाला निवेदन
The गडविश्व
गडचिरोली, १२ नोव्हेंबर : सिरोंचा तालुक्यातील पिरमीडा गावातील अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाई करा अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा गाव संघटनेच्या महिलांनी रेंगुठा उप पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
रेंगुठा उप पोलिस स्टेशन अंतर्गत पिरमीडा गावात 5 दारूविक्रेते सक्रिय आहेत. या विक्रेत्यांना अवैध दारूविक्री बंद करण्याची विनंती करूनही अवैध व्यवसाय सुरूच ठेवला आहे. दारू पिणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. गावामध्ये भांडण-तंटे होत आहेत. गावातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात आलेली असून दारू विक्रेत्यांवर तत्काळ कारवाई करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असेही पोलिस विभागाला सादर केलेल्या निवेदनात महिलांनी म्हटले आहे. सोबतच दारू विक्रेत्यांची यादीही सादर करण्यात आली.