– गावकऱ्यांची मागणी
The गडविश्व
गडचिरोली, २९ सप्टेंबर : जिल्हा मुख्यालयापासून जवळच असलेल्या दिभना येथे अवैधरित्या दारूविक्री होत असून कारवाई करण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असतांनाही मोठ्या प्रमाणात अवैध दारूविक्री होत असल्याचे दिसून येते. जिल्हा मुख्यालयापासून जवळच असलेल्या दिभना येथे काही इसम मोहफूल व देशीदारूची अवैध विक्री केल्या जात असल्याची माहिती आहे. यामुळे गावातील शांतता व सुव्यावस्था धोक्यात येणाची दाट शक्यता असून याकडे पोलीस प्रशासनाने विशेष लक्ष देवून गावातील दारू विक्री बंद करावी अशी मागणी दिभणा येथील नागरिकांनी केली असून यावर पोलीस प्रशासन काय कार्यवाही करतात याकडे दिभान वासियांचे लक्ष लागले आहे.