दिवसा घरफोडी करणाऱ्या चोरट्यास ठोकल्या बेड्या

563

– आणखी घरफोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता
– आरोपीस नागपूरातून केली अटक
The गडविश्व
वर्धा : दिवसा घरात कोणीही नसतांना पाहून घरफोडी करणाऱ्या चोरट्यास सेवाग्राम पोलिसांनी नागपुरातून अटक करत बेड्या ठोकल्या आहे. सम्मेत उर्फ पोग्या संतोष दाभने (२२) रा. सुभाष नगर, नागपूर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, अशोक व्यंकटराव पोहाणे हे शिक्षक असून ते दत्तपुर येथे राहतात. ते १६ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास कर्तव्यावर गेले व दुपारी ३ वाजता घरी परतले असता त्यांना घराचे कुलूप तुटलेले दिसले व घरात जाऊन पाहणी केली असता कपाटातील १२ हजार रुपये, टायटन कंपनीची हातघडी किंमत १ हजार रुपये, स्कुल बॅग ५०० रुपये, दोन पॅन्ट व शर्ट पीस १ हजार रुपये, CCTV DVR CR+ कंपनीचा किंमत ४ हजार रुपये असा एकूण १८ हजार २०० रुपयांचा माल अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याचे दिसून आले. याबाबत त्यांनी पोलीस स्टेशन सेवाग्राम येथे तक्रार दाखल करून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. व सदर गुन्ह्याची तात्काळ दखल घेत गुप्त माहितीच्या आधारे आरोपी सम्मेत उर्फ पोग्या संतोष दाभने (२२) रा. सुभाष नगर, नागपूर याला अटक करून त्याच्या जवळून चोरलेला काही माल व चोरी करण्याकरिता वापरण्यात आलेले साहित्य जप्त करण्यात आले. आरोपीची सखोल विचारपूस केली असता आरोपीने पोलीस स्टेशन वर्धा शहर हद्दीमधून चोरी केल्याचे सांगितले त्यामुळे आरोपीकडून आणखी घरफोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अपर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, वर्धाचे उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनात सेवाग्राम पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मणे यांच्या निर्देशाप्रमाणे पोलीस अंमलदार हरिदास काकड, गजानन काठाने, प्रकाश लसूनते, पवन झाडे, अभय इंगळे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here