– हितापडी,राणीपोदूर येथे शिबीर
The गडविश्व
गडचिरोली, १७ ऑक्टोबर : भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम भागात वसलेल्या हितापडी, राणीपोदूर येथील २६ रुग्णांना दारूचे दुष्परिणाम लक्षात येताच, गाव पातळीवर आयोजित व्यसन उपचार शिबिराला भेट देऊन उपचार घेतला आहे.
दुर्गम भागातील रुग्णांना उपचाराची सोय उपलब्ध व्हावी, यासाठी मुक्तीपथच्या वतीने विविध गावात व्यसन उपचार शिबिरांचे आयोजन करण्यात येते. नुकतेच भामरागड तालुक्यातील हितापडी येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरातून १२ रुग्णांनी पूर्ण उपचार घेतले. यावेळी गाव पाटील सोमजी पुंगाटी, पांडू पुंगाटी उपस्थित होते. राणीपोदूर येथील शिबिराचा १४ रुग्णांनी लाभ घेतला. दोन्ही शिबिरांमध्ये समुपदेशक साईनाथ मोहूर्ले यांनी रुग्णांची तपासणी व धोक्याचे घटक सांगितले. संयोजिका पूजा येल्लुरकर यांनी केस हिष्ट्री घेत दारूचे दुष्परिणाम समजावून सांगितले. यशस्वीतेसाठी आनंदराव मडावी, सुंदरशाह वेलादी, शकुंतला मडावी यांनी सहकार्य केले. दोन्ही शिबिराचे नियोजन मुक्तिपथचे आबिद शेख व विद्या पुंगाटी यांनी केले.