– संचालक मंडळाची उपस्थिती
The गडविश्व
ता.प्र / देसाईगंज,३० ऑक्टोबर : महाराष्ट्र स्टेट को-आॕपरेटीव्ह मार्केटिंग फेडरेशन लि.शासकीय आधारभूत किंमत खरीप भात खरेदी योजना सन २०२२-२३ अंतर्गत देसाईगंज तालुक्यातील देसाईगंज सहकारी शेतकी खरेदी विक्री संस्था र.नं.१९०९ वडसा तर्फे भात खरेदी केल्या जाणाऱ्या केंद्राचे उद्घाटन आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते आज ३० ऑक्टोबर २०२२ रोजी करण्यात आले.
उद्घाटन सोहळ्याला देसाईगंज सहकारी खरेदी विक्री संस्थेचे उपाध्यक्ष अन्नाजी तुपट , व्यवस्थापक पुंडलिक तलमले , घनश्याम टिकले, शेतकरी लोकनाथ विलास कापगते, सोपान राऊत , विष्णू दुनेदार, बाजार समिती देसाईगंज शाखा प्रमुख पुरुषोत्तम दुफारे, आबाजी राऊत, ज्ञानेश्वर बुल्ले , गजानन नखाते, सुधिर गायकवाड उपस्थिती होते.
शेतकऱ्यांनी शासकीय आधारभूत भात खरेदी केंद्राचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन देसाईगंज सहकारी शेतकी खरेदी विक्री संस्थेच्या संचालक मंडळाने केले आहे. लवकरच संबंधीत केंद्रावर नियमित भात खरेदी केली जाणार आहे.