The गडविश्व
देसाईगंज : राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य व जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्या आदेशान्वये आज १३ जून २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता नगर परिषद सभागृह येथे देसाईगंज नगर परिषदेच्या सार्वत्रीक निवडणूक- २०२२ साठी यथास्थिती प्राधान्यक्रमाने तसेच चिठ्ठया टाकून जागांचे आरक्षण निश्चित करण्याची कार्यवाही करण्यात आले
प्रथम उपस्थित सर्व प्रतिनिधी / नागरिक यांना नगरपरिषदेच्या प्रभाग रचना /आरक्षण बाबत व निवडणुकीसंबंधी सविस्तर माहिती देण्यात आली व त्यानंतर सोडतीकरिता नगर परिषद, देसाईगंज शाळेतील लहान मुले / मुली कुमार. आयुष दिलीप मेश्राम (९), कुमारी हर्षदा संदिप राऊत (९), कुमारी नव्या भाष्कर मारबते (७) या मुलांच्या हस्ते विहीत कार्यपध्दती अनुसरुन उपस्थित सर्व नागरिक / प्रतिनिधी यांच्या समक्ष चिठ्ठया काढण्यात आल्या. तसेच यथास्थिती प्राधान्यक्रम विचारात घेऊन आरक्षित प्रभाग निश्चित करण्यात आले.
देसाईगंज नगर परिषदेची सदस्य संख्या २१ असून ११ जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. देसाईगंज नगरपरिषेदेमध्ये अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी २ जागा आरक्षित असून अनुसुचित जमातीच्या महिलांसाठी एकही जागा आरक्षीत नाही व सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी ९ जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत .
प्रभागनिहाय आरक्षण
प्रभाग क्रमांक १ – १- अनुसूचित जाती (महिला), सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक २ – सर्वसाधारण ( महिला ), अनुसूचित जमाती सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ३ – सर्वसाधारण ( महिला ), सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ४ – सर्वसाधारण ( महिला ), अनुसूचित जाती सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ५ – अनुसूचित जाती ( महिला ), सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ६ – सर्वसाधारण ( महिला ), सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ७ – सर्वसाधारण ( महिला ), सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ८ – सर्वसाधारण ( महिला ), अनुसूचित जाती सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ९ – सर्वसाधारण ( महिला ), सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक १० – सर्वसाधारण ( महिला ), सर्वसाधारण ( महिला ), सर्वसाधारण
वरीलप्रमाणे कामकाज पूर्ण करण्यात येऊन उपस्थित सदस्य / नागरिकांचे / प्रतिनिधींचे आभार मानून विषयांकीत सभा संपल्याचे जाहीर करण्यात आले.
यावेळी पिठासीन अधिकारी उपविभागीय अधिकारी जे.पी.लोंढे, मुख्याधिकारी विजयकुमार आश्रमा, देसाईगंज नगर परिषद क्षेत्रातील विविध पक्षांचे पदाधिकारी व नगर परिषद कर्मचारी उपस्थित होते.