– आमदार कृष्णा गजबे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनातून दिला होता इशारा
– मागणी पुर्ण होतपर्यंत आंदोलन स्थळावरून न उठण्याचा आंदोलकांचा पवित्रा
The गडविश्व
देसाईगंज : तालुक्यासह गडचिरोली जिल्हयातील कृषी पंपाना 24 तास विजपुरवठा देण्यात यावा याकरिता आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णाजी गजबे यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरून वडसा-आरमोरी मुख्य मार्गावरील उपकार्यकारी अभियंता विद्युत वितरण विभाग वडसा येथे चक्काजाम करून आंदोलन करीत आहे. यामुळे या मार्गावरील वाहतुक ठप्प झाली आहे. वडसा-आरमोरी तसेच वडसा-कुरखेडा मार्गावर वाहनांची लाबंच लाब रांग लागली आहे.
गडचिरोली जिल्हयातील नागरिक हा शेती व्यवसायावर अवलंबुन आहे. येथील शेतकरी सिंचन सुविधेसाठी 24 तास विजेवर अवलंबून असतांना 8 तास वीजपुरवठा करण्यात येत असल्याने अडचणीत सापडला आहे. तालुक्यासह जिल्हातील कृषी पंपांना 2४ तास सुरळित विज पुरवठा देण्यात यावा अन्यथा 10 जानेवारी पासून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आमदार कृष्णा गजबे यांनी गडचिरेालीचे जिल्हाधिकारी यांना पत्राव्दारे दिला होता. सदर निवेदनाची कोणतीही दखल न घेतल्याने आमदार कृष्णा गजबे यांच्या नेतृत्वात शेतकरी रस्त्यावर उतरून आज १० जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता पासून वडसा- आरमोरी मार्गावरील उपकार्यकारी अभियंता विद्युत वितरण विभागाच्या कार्यालयासमोर चक्काजाम आंदोलनाला बसले आहे. तसेच मागण्या पुर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलनस्थळारून उठणार नाही असा पवित्राच आंदोनकत्यांनी घेतला आहे. चक्काजाम आंदोलनामुळे वडसा आरमोरी माार्गावरील वाहतुक ठप्प झाली असून वडसा आरमोरी तसेच वडसा कुरखेडा मार्गावर वाहनांची लांबच लाब राग उभी आहे.