– देसाईगंज पोलीसांची धडक कारवाई
The गडविश्व
देसाईगंज : तालुक्यातील विहीरगांव जंगल परिसरात मोठया प्रमाणात कोंबडा बाजार भरत असतो. या कोंबडा बाजारात लोखोंचा जुगार खेळल्या जात असल्याची गोपनीय माहिती देसाईगंज पोलीसांना मिळताच देसाईगंज पोलीसांनी कोंबडा बाजारावर धाड मारून 3 हजार 900 रूपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई काल 30 जानेवारी रोजी करण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार, देसाईगंज तालुक्यातील विहीरगांव जंगल परिसरात अनेक दिसवसांपासून कोंबडा बाजार मोठया प्रमाणात भरतो. या कोंबडा बाजारात लाखोंच्या शर्यती लावल्या जातात. हा एक जुगारच असून कोंबडा बाजार भरवण्यास मनाई असूनही अवैधरित्या कोंबडा बाजार भराविला जातो. सदर कोंबडा बाजाराबाबात देसाईगंज पोलीसांना गोपनिय माहिती मिळाली असता कोंबडा बाजारावर धाड मारून जिवंत व मृत कोंबडे व रूपये असा एकुण 3 हजार 900 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तसेच यातील आरोपी अब्दुल कलीम मस्जीद शेख (49) रा.जवाहननगर वार्ड, देसाईगंज जि.गडचिरोलीद, तेजराम रावजी बाडे (50) रा. चिखली ता. देसाईगंज जि.गडचिरोली, दादाजी निंबाजी गजभिये (60) रा. हनुमान वार्ड देसाईगंज जि.गडचिरोली, बलदेव श्रावण सेलोट (55) रा. आमगांव ता. देसाईगंज जि.गडचिरोली, एकनाथ गजानन भर्रे (35) रा.चिखली तु ता. देसाईगंज जि.गडचिरोली, प्रभाकर जगन डोलारे (50) रा. चिखली रिठ ता. देसाईगंज जि. गडचिरोली यांच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 1887 अन्वये देसाईगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.