धक्कदायक : घरात आढळले ६ जणांचे मृतदेह

311

– दोन पुरुष आणि ४ महिलांचा समावेश, परिसरात खळबळ
The गडविश्व
जम्मू-काश्मीर, १७ ऑगस्ट : जम्मूतील सिध्रा येथील राहत्या घरात ६ जणांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. यामध्ये दोन पुरुष आणि ४ महिलांचा समावेश असल्याची माहिती आहे.
जम्मूतील सिध्रा येथे दोन निवासी घरात सापडलेल्या मृतदेहांच्या शरीरावर गोळ्यांचे कोणतेही निशाण नसल्याचे सूत्रांनी सांगितले. मृत्यूचे खरे कारण शोधले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार एका घरात दोन तर दुसऱ्या घरात चार मृतदेह सापडले आहेत.
सकीना बेगम, त्यांच्या दोन मुली नसीमा अख्तर आणि रुबिना बानो, मुलगा जफर सलीम आणि दोन नातेवाईक नूर-उल-हबीब आणि साजाद अहमद अशी मृतकांची नावे आहेत असे पोलिसांनी सांगितले. सिध्रा येथील कुटुंबीयांच्या घरातून मृतदेह बाहेर काढण्यात आले असून त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात तपासासाठी पाठविण्यात आले आहेत. सर्व मृतदेह शवविच्छेदन आणि ओळखी पटविण्यासाठी पाठवण्यात आले आहेत. सदर घटनेने परिसरात खळबळ आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here