धक्कादायक : आईकडून पोटच्या ५ वर्षीय मुलीचा अमानुष छळ

1248

सामाजिक कार्यकर्त्या चित्रा देशमुख यांच्या मदतीने मुलीची सुटका
– पोलिसांनीही आईला शिकविला धडा

The गडविश्व
पनवेल (जितीन शेट्टी), १ ऑगस्ट : ‘स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी’ अशी म्हण आहे परंतु या उलट विचित्र उदाहरण पनवेल येथील चैतन्य सोसायटीमध्ये घडलेले पाहायला मिळाले. एक आई आपल्या पोटच्या पाच (५) वर्षीय मुलीला अमानुषपणे वागणूक देऊन जबर मारहाण करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. हा सर्व प्रकार सोसायटीमधील काही नागरिकांनी मोबाईल मध्ये कैद करून सामाजिक कार्यकर्त्या चित्रा देशमुख यांना पाठवून त्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने मुलीची त्या आई कडून सुटका करण्यात आले असून घडलेल्या प्रकाराबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे.
प्राप्त माहितीनुसार, पनवेल च्या चैतन्य सोसायटीमध्ये एका कुटुंबातील आई आपल्या पोटच्या ५ वर्षीय मुलीला अमानुषपने मारहाण करत शारीरिक आणि मानसिक छळ करत होती. चिमुरडीला भुके ठेवणे, घरात बांधून ठेवणे, केसाने उचलून फेकणे, सतत मारहाण करणे असे अमानुष पद्धतीने आई त्या मुलीला त्रास देत होती. सोसायटी मधील हा घडलेला प्रकार मोबाईल मध्ये कैद करून सौ. जना सुतार आणि सोसायटी मधील सर्व महिला व्हिडिओ सामाजिक कार्यकर्त्या चित्रा देशमुख यांना पाठविला. व्हिडिओ बघून सामाजिक कार्यकर्त्या चित्रा देशमुख यांनी तात्काळ खांदेश्वर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शाखेच्या महिला पोलीस निरीक्षक वैशाली गलांडे यांना हा सर्व प्रकार सांगितला. यावेळी महिला पोलीस निरीक्षक वैशाली गलांडे यांनी कोणताही वेळ न गमावता पोलीस पथक चैतन्य सोसायटी मध्ये पाठवून त्या आईकडून मुली सुटका करून घेतली व तिला उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले. तसेच त्या मुलीच्या आईला समज देण्यात आली आहे.
चैतन्य सोसायटी मधील सर्व धाडसी महिला आणि सर्व लहान मुले यांनी हा सर्व प्रकार धाडसीपणाने समोर आणला ज्यामुळे त्या लहान मुलीचा जीव वाचला. सदर कारवाई गुन्हे शाखेच्या महिला पोलीस निरीक्षक वैशाली गलांडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस अधिकारी परशुराम केंगार,विठ्ठल पारधी, अमोल खाडे यांनी पार पाडली. सामाजिक जाणीव ठेऊन काम केल्याबद्दल या सोसायटीला शौर्य पदक मिळाले पाहिजे तसेच गुन्हे शाखेच्या महिला पोलीस निरीक्षक वैशाली गलांडे आणि सर्व पोलिस अधिकाऱ्यांना सुध्दा शौर्य पदक मिळावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.©

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here