– गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस मदत केंद्र गट्टा (जा) हद्दीतील घटना
The गडविश्व
गडचिरोली : जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील दोन आदिवासी युवकांची नक्षल्यांनी निघृन हत्या केल्याची घटना आज गुरुवारी सकाळच्या सुमारास पोलिस मदत केंद्र गट्टा (जा) हद्दीत उघडकीस आली. मंगेश मासा हिचामी (२७) रा. झारेवाडा, नवीन पेका नरोटे (२५) रा. गोरगट्टा असे हत्या केलेल्या युवकांची नावे आहे.
नक्षल्यांनी मंगेश हिचामी व नवीन नरोटे यांना काल बुधवारी रात्रोच्या सुमारास घरातून बळजबरीने घेऊन गेले व त्यांची हत्या केली. हत्या करून दोघांचे मृतदेह रस्त्यावर आणून ठेवले.
एक पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरून तर दुसरा आत्मसमर्पण नक्षली असल्यावरून हत्या केल्याची माहिती आहे. सदर घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून एकच खळबळ उडाली आहे.