– वाढत्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण, बिबटयाला जेरबंद करण्याची मागणी
The गडविश्व
चंद्रपूर : येथून जवळच असलेल्या दुर्गापूर येथे घराच्या आवारात असलेल्या महिलेवर बिबटयाने हल्ला करून ठार केल्याची घटना काल रात्रोच्या सुमारास घडली. गीता मेश्राम (अंदाजे वय ४५) असे बिबटयाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या माहिलेचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, दुर्गापूर येथील वार्ड क्रं 3 मधील गीता मेश्राम या काल रात्रोच्या सुमारास आपल्या घराच्या आवारात होत्या. दरम्यान बिबटयाने त्यांच्यावर हल्ला करून ठार केले. मागील दोन महिन्यांपासून परिसरात अशा घटना घडत आहे. तर मागील पंधरा दिवांपूर्वी या परिसरातून बिबटया जेरबंद करण्यात आला होता. त्यानंतर आता सदर घटना घडल्याने परिसरात पुन्हा बिबटया असल्याचे स्पष्ट होत आहे. सदर घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले असून बिबटयाचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी जोर धरत आहे.