– वैनगंगा नदी पुलावरून घेतली उडी
The गडविश्व
गडचिरोली,१८ जुलै : जिल्हा सीमेलगत असलेल्या आरमोरी येथील वैनगंगा (Wainganga River) नदीपात्रात महिलेने उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवार १८ जुलै २०२२ रोजी दुपारी १ ते २ वाजताच्या सुमारास घडली. लता भाऊराव डोईजड रा. नागभीड असे सदर आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार , नागभीड येथील लता डोईजड यांनी आरमोरी-ब्रम्हपुरी मार्गावर असलेल्या वैनगंगा नदी पुलावरून नदीपात्रात उडी घेतली. याबाबतची माहिती मृतकाच्या कुटुंबियांनी दिली असून सदर प्रकरणी ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्याचेही सांगितले आहे. नदी शेजारील गावकऱ्यांना अथवा नदीपत्राच्या कडेला मृतदेह आढळल्यास मयूर डोईजड 8623822373, मिलिंद डोईजड 7387381970 यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन कुटुंबीयांनी केले आहे. नदीपात्रात पाण्याच्या पातडीत वाढ झाली असल्याने व पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने मृतदेह कुठे आढळेल हे सांगता येत नाही. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. पुढील तपास पोलीस करीत आहे.