धक्कादायक : विज पडुन दोघांचा मृत्यू

1421

– शेतशिवारात काम करीत असतांना घडली घटना
The गडविश्व
ता. प्र / सावली, १२ सप्टेंबर : तालुक्यात विजांच्या कडकडाटेसह मुसळधार पावसाने हजेरी लावली. दरम्यान काल ११ सप्टेंबर ला तालुक्यातील वेगवेगळ्या घटनेत वीज पडून दोघांचा मृत्यू झाला. शरद पंढरी मुनघाटे (५०) रा. गेवरा खुर्द व मंगला सुधाकर येलेट्टीवार (५५) रा. चकपिरंजी (शाळा हेटी) असे वीज पडून मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
तालुक्यातील गेवरा खुर्द येथील शेतकरी शरद पंढरी मुनघाटे (५०) हे शेतात निंदणा चे काम करीत असताना दुपारी ३ वाजताच्या सुमारास जोरदार विजेचा गडगडाट झाला त्यावेळी विज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर सोबतच शेतात पाच सहा महिला काम होत्या त्यापैकी एक महिला गंभीर आहे, याची माहिती पाथरी पोलीस स्टेशनला देण्यात आली असता ठाणेदार मोहोड हे आपल्या टिमसह घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करून शवविच्छेदनासाठी प्रेत सावली ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले तर दुसऱ्या घटनेत सावली पासून जवळच असलेल्या चकपिरंजी (शाळा हेटी) येथील महिला मंगला सुधाकर येलेट्टीवार (५५) ह्या शेतात निंदणाचे काम करण्यासाठी गेल्या असता दुपारच्या सुमारास विज पडून मृत्यू झाला. तालुक्यात एकाच दिवशी वीज पडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मृत शेतकऱ्याच्या आकस्मिक निधनाने कुटुंबावर दुखा:चे सावट पसरले असून गावात शोककळा पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here