धक्कादायक : स्वयंपाक बनवण्यासाठी उशीर झाल्याने पत्नीला जिवंत जाळण्याचा केला प्रयत्न

475

– पीडित महिला 35 ते 40 टक्के भाजली
The गडविश्व
पुणे : पत्नीकडून स्वयंपाक बनवण्यासाठी उशीर झाल्या कारणाने पतीने पत्नीला डिझेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कदायक घटना पिंपरीच्या नेहरूनगरमध्ये ५ फेब्रुवारीच्या दुपारी घडली. या प्रकरणी पती राहुल पारधे विरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पिंपरी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. राहुल पारधे हा आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर नेहमी संशय घेत असल्याचीही माहिती आहे. या घटनेत पीडित महिला ही 35 ते 40 टक्के भाजली असून तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here