धानोरा : चारचाकी वाहनाच्या धडकेत इसम ठार

978

– बैलाला वाचवण्याच्या प्रयत्नात झाला अपघात
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, २ ऑक्टोबर : तालुक्यातील येरकड येथील पायी चालत जाणाऱ्या इसमाला मुरुमगाव कडून येणाऱ्या चार चाकी वाहनाने बैलाला वाचवण्याच्या प्रयत्नात असतांना नियंत्रण सुटल्याने जोरदार धडक दिल्याने इसमाचा मृत्यू झाल्याची घटना आज २ ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास घडली. तुळशीराम मडावी (अंदाजे वय ७५ ) रा.येरकड असे मृतकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, एमएच ३३ एसी २३९७ क्रमांकाची चारचाकी वाहन मुरुमगाव कडे येत होती. दरम्यान रस्त्यावरील बैलाला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या तुळशीराम मडावी यांना जबर धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. उपचारा करिता ग्रामीण रुग्णालय धानोरा येथे दाखल केले असता उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस स्टेशन धानोरा येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून चारचाकी वाहन पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here