– लाखोंच्या साहीत्याची चोरी
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, १४ नोव्हेंबर : येथील जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयातील लाखो रुपयांचे शैक्षणिक साहीत्य अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली असुम यामुळे शाळेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सदर घेतनेने खळबळ माजली आहे. प्राप्त माहितीनुसार, धानोरा येथील मुख्य मार्गावर असलेले जिल्हा परिषद हाँयस्कुल तथा कनिष्ठ महाविद्यालयाला दिवाळीत १५ दिवसाच्या सुट्या होत्या. त्या सुट्यातअज्ञात व्यक्ती ने १ लाख ८८ हजार ५०० रुपयाचे शैक्षणिक साहित्य लंपास केल्याची घटना १० नोव्हेंबर २०२२ रोजी उघडकीस आल्याने धानोरा शहरात एकच खळबळ उडाली आहे. दिवाळीच्या सुट्ट्या च्या दरम्यान शाळेत कोणीच नव्हते, कारण शाळेला चौकिदार नसल्याने सुट्ट्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी महाविद्यालयातील एक एलईडी टीव्ही, एक मॉनिटर, एक बॅटरी, वायरलेस, दोन माईक , वेल्डिंग मशीन, ड्रिल मशीन ,ग्राइंडर मशीन ,ड्रिल मशीन , हँड ड्रिल मशीन, बॅक कॅमेरा, वॉटर पंप, इन्वर्टर सेट असा १ लाख ८८ हजार ५०० रुपयाचे शैक्षणिक साहित्य लंपास केले. सुट्ट्याचा कालावधी संपल्यानंतर १० नोव्हेंबर रोजी शाळा उघडण्यात आली असता कुलूप फोडून काही दरवाजे खुले असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे चोरीचा प्रकार लक्षात आला. सदर घटनेची माहिती मुख्याध्यापक कोहाडे यांनी पोलीस स्टेशन धानोरा येथे दिली. तक्रारीवरून पोलिसांनी मोका चौकशी करून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. माहितीनुसार तीन संशयित आरोपींना चौकशीसाठी बोलविण्यात आलेले होते अशी माहिती आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सुधाकर देडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन शिरसाठ करीत आहेत.