– १०४ कि.मी. वरुण करतात प्रवास
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, २२ सप्टेंबर : तालुक्यातील अति दुर्गम भागातील पयडी येथिल ग्रामसेविका आठवड्यातून एकच दिवस हजर राहतात तसेच १०४ कि.मी. च्या अंतरावरुण प्रवास करतात यामुळे येथील लोकांची कामे अडुन राहतात व दाखल्या करिता तातकळत रहावे लागत असल्याचे कळत असून सतत गैरहजर राहात असल्याने येथील लोकांची कामे अडुन असुन शासनाच्या अनेक योजने पासुन लाभार्थ्यांना वंचित राहावे लागत असल्याचा आरोप गावकरी करीत आहेत.
धानोरा तालुक्यातील अतिदुर्गम क्षेत्र म्हणून ओळख असलेल्या पयडी येथील ग्रामसेविका आठवड्यातून एकच दिवस उपस्थित राहात असल्याने विकास कामाचा बोजवारा उडाल्याचे पहायला मिळते. मीनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या ग्रामपंचायतमध्ये कामाचा नियोजन विकास कामाचा निधि वेळच्यावेळी नियोजन करून खर्च करण्याकरिता गावस्तरावर ग्रामसेवक हजर राहणे आवश्यक आहे. परंतु येथील ग्रामसेविका १०४ किलोमीटर वरून ग्रामपंचायत ला हजर झाल्यानंतरच दाखले किंवा इतर कामे केल्या जातात. संबंधित वरिष्ठ अधिकारी याकडे मुदामच कानाडोळा करतात अशी खंत गावकऱ्यांनी व्यक्त केली. येथिल सचिव ह्या चामोर्शी वरून गडचिरोली मार्गे धानोरा तालुक्यातील अतिदुर्ग भाग असलेल्या पयडी येथे येतात. नियमावलीत कर्मचाऱ्यांनी मुख्यालय राहावे असे शासनाचे परिपत्रक असताना सुद्धा येथील ग्रामसेविका ह्या एवढ्या अंतरावर ये-जा करतात हि गांभीर्याची बाब आहे. या कडे आता तरी वरिष्ठ अधिकारी लक्ष देतील काय असाही प्रश्न गावकरी विचारीत आहेत.
राज्य शासनाने सर्वसामान्य जनतेची कामे विहित वेळेत व विहित मुदतीत होण्यासाठी राज्य शासनाने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर २०२२ पर्यंत सेवा पंधरवाडा पाळण्याचे शासन परिपत्रक काढले असून त्यात कोणत्याच प्रकारची हयगय करता कामा नये अशाही सूचना शासकीय कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. मात्र अशा कित्येक जबाबदार कर्मचारी अनुपस्थित असल्याने जनतेचे कामे शासनाच्या परिपत्रकानुसार होतच नाही, शासनाचे कर्मचारी केराची टोपली दाखवत आहेत. धानोरा पंचायत समिती चे ग्राम विस्तार अधिकारी लुमदेव जुवारे यांना मोबाईल फोन द्वारे विचारना केली असता नियमामध्ये जे बसेल त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले, जर उपस्थित नसतील तर नागरिकांनी लेखी तक्रार दिले तर नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल.