The गडविश्व
ता.प्र / धानोरा, ७ सप्टेंबर : स्थानिक धानोरा येथील श्री जीवनराव सिताराम पाटील मुनघाटे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्ताने स्वयंशासन या उपक्रमांतर्गत शिक्षक दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांचा अधिक प्रमाणात सहभाग होता. याप्रसंगी महाविद्यालयातील आचार्य पदवी प्राप्त डॉ. विना जम्बेवार , डॉ. दामोदर झाडे, डॉ. प्रवीण गोवणे, डॉ. संजय मुरकुटे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आचार्य पदवी प्राप्त करणे हा प्रत्येक शिक्षकांचा अंतिम लक्ष साध्यगत करणे असतो असे वक्तव्य प्राचार्य डॉ. पंकज चव्हाण यांनी केले.
याप्रसंगी मंचावर अध्यक्ष म्हणून डॉ. पंकज चव्हाण व डॉ. आर पी किरमिरे उपस्थित होते. सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. प्रियंका पठाडे कार्यक्रमाचे आयोजक होते व रा .से.यो.कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक ज्ञानेश्वर यांनी कार्यक्रमाचे संचालन केले तर आभार प्राध्यापक प्रशांत वाळके यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांचा पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी तथा विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने संपन्न झाली.