धानोरा : मुनघाटे महाविद्यालयात राष्ट्रीय स्थापन दिवस साजरा

183

The गडविश्व
ता.प्र /धानोरा, २६ सप्टेंबर : स्थानिक श्री.जिवनराव सिताराम पाटिल मुनघाटे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय धानोरा, येथे रा .से. यो. विभागाद्वारा राष्ट्रीय स्थापना दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रा.डॉ. गणेश चुदरी अध्यक्षस्थानी उपस्थित होते तसेच प्रा. डॉ. विना एम जम्बेवार ,डॉ. एच .डी. लांजेवार ,डॉ. दामोदर झाडे, प्रा.ज्ञानेश्वरबनसोड आदि मान्यवर मंचावर स्थानापन्न होते.
रा.से यो विद्यार्थ्यांची सर्वांगीण विकासाचे प्रभावी माध्यम आहे.विद्यार्थ्यांचे नेतृत्वाविकास सह श्रमसंस्काराचे धडे रा से यो द्वारा विद्यार्थ्यांना प्राप्त होते. समुदायातून शिक्षण व शिक्षणातून विकास साध्य होतो. तसेच समानता, सामाजिक दायित्व, बंधुभाव राष्ट्रीय ऐक्य भावना नवतरुणांमध्ये वृद्धिमान होण्यास मदत होते असे विचार डॉ. गणेश चुदरी यांनी व्यक्त केले.
रा से यो ची स्थापना महात्मा गांधी यांच्या कल्पनेतून साकार झाली या निमित्य नेहरू युवा केंद्र तथा रा से यो विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी यांचे विचार व प्रासंगिकता इत्यादी विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत अधिक प्रमाणात विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाचे संचालन रा से यो कार्यक्रमाधिकारी प्रा ज्ञानेश बनसोड यांनी केले तर आभार प्रियंका पठाडे यांनी मानले. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते .कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here