धानोरा येथील सीआरपीएफ जवानांना मिळणार पिण्याचे शुद्ध पाणी

318

– सीआरपीएफ कॅम्पमध्ये वाटर प्लांट चे उदघाटन
गडविश्व
ता. प्र. / धानोरा : येथील सीआरपीएफ जवानांना आता पिण्याचे शुद्ध पाणी मिळणार आहे. सुरक्षा व्यवस्थेत असताना कधीकधी जवानांना अशुद्ध पाण्याच्या माध्यमातून तहान भागवावी लागत होती. या पार्शवभूमीवर धानोरा येथील सीआरपीएफ ११३ बटालियनच्या मुख्यालयात शुद्ध पाणी/जल संयंत्र लावण्यात आले आहे.सदर वाटर प्लांटचे २४ मे रोजी कमांडंट जी.डी. पंढरीनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली पी सी कृष्णन कुट्टी (P.M.G.) (शौर्यसाठी पोलीस पदक) हेड कॉन्स्टेबल/ड्रायव्हर ११३ बटालियन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. हेड कॉन्स्टेबल/ड्रायव्हर कृष्णन कुट्टी यांना १९९७ मध्ये मणिपूरमध्ये घातपाती दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात अदम्य धैर्य आणि शौर्य दाखविल्याबद्दल पोलीस शौर्य पदक देण्यात आले.
या कार्यक्रमाला द्वितीय कमान अधिकारी राजपाल सिंग, उप कमांडंट एम.जे.  प्रदेश, प्रमोद सिरसाट, वैद्यकीय वैद्यकीय अधिकारी डॉ.आदित्य पुरोहित, तसेच सर्व जवान व अधिनस्त अधिकारी उपस्थित होते.  सर्वांनी कमांडंटचे मनापासून आभार व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here