– रक्तदान शिबिराचेही आयोजन
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, ३१ जुलै : तालुक्यातील सर्व वनपरिक्षेत्रातर्फे जागतिक व्याघ्र दिवस तसेच आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रम धानोरा येथील वन निवासाच्या प्रांगणात २९ जुलै रोजी साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम वाघ हल्ल्यात निधन झालेल्या नीलकंठ मोहुर्ल दिभना, खुशाल निकुरे धुडेशिवणी यांना मौन श्रद्धांजली अर्पित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
धानोरा तालुक्यातील अधिकारी कर्मचारी तसेच जिल्हा परिषद हायस्कूल धानोरा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभात फेरी काढण्यात आली. तसेच वनवसाहत परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रक्तदान शिबिरात २७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच या कार्यक्रमात पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धनादेश वितरित करण्यात आले. आपल्या उपक्षेत्रात/ नियत क्षेत्रात वाघ सनियंत्रण तसेच वन संवर्धन कामात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्रक वितरित करून शाळेतील विद्यार्थ्यांनी भाषण दिल्याबद्दल प्रोत्साहन पर प्रशस्तीपत्रके वितरित करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गडचिरोली वन विभागाचे निलेश दत्त शर्मा (भावसे) हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून गडचिरोलीचे सहाय्यक वनसंरक्षक जमीर एम. शेख (भावसे), हरवीर सिंग (भावसे) गडचिरोली, गडचिरोली वनविभागाचे सहायक वनसंरक्षक सोनल भडके, मानद वन्यजीव रक्षक मिलिंद उमरे, नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ. पौर्णिमाताई हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुरूमगाव
वपअ पूर्व अविनाश भडांगे यांनी तर संचालन झरी चे क्षेत्र सहाय्यक सुनील पेदोंरकर यांनी केले तर आभार कुमारी वाय. पी. राऊत धानोरा यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वी करण्याकरिता धानोरा तालुक्यातील वनपरिक्षेत्र अधिकारी व त्यांच्या अधिनस्त सर्व कर्मचारी यांनी सहकार्य केले.