– विद्यार्थी व पालकांची मागणी
The गडविश्व
ता.प्र / धानोरा : तालुक्यातील संपूर्ण शाळा महाविद्यालय सुरु झाले असून विद्यार्थ्यांना दररोज शाळेत व महाविद्यालय नियमित पुर्ण तिकिट काढून यावे लागत असल्याने आर्थिक भुर्दंड बसत आहे. त्यामुळे धानोरा येथेच बस पास उपलब्ध करुण द्या अशी मागणी शालेय विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे.
धानोरा तालुक्यातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालये, महाविद्यालय नियमित सुरु झाले आहेत. विद्यार्थ्यांची दररोजची रेलचेल चालू झालेली आहे परंतु बस पस अभावी विद्यार्थ्यांना पूर्ण तिकीट काढुन शाळा महाविद्यालय गाठावे लागत आहे. याचा आर्थिक फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. तालुक्यात शेतकरी, शेतमजुर पालक आहेत त्यामुळे त्यांना हे परवडनारे नाहीत. विद्यार्थ्यांना बस पास काढण्यासाठी गडचिरोली ला जावे लागत असल्याने केवळ पास काढण्याकरिता जाणे हे सुद्धा परवडणारे नाही. धानोरा येथे बस पास काढण्याची सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांना शाळा सोडुन नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तर किमान आठवड्यातून तीन दिवस एस .टी. महामंडळाने बस पास सुविधा धानोरा येथे देऊन विद्यार्थ्यांचे होत असलेली ससेहोलपट थांबवावी अशी मागणी पालक व विध्यार्थ्यानी केली आहे.