The गडविश्व
ता.प्र / धानोरा, १४ नोव्हेंबर : बौद्ध समाज धानोरा व द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा धानोरा यांच्या वतीने
धानोरा येथे बौद्ध धम्म संमेलन डॉ. राजरत्न आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष रोहिदास राऊत जेष्ठ पत्रकार तथा आंबेडकर विचारवंत गडचिरोली, विजय बनसोड नागपूर विभागीय अध्यक्ष, भावना खोब्रागडे, देवाजी तोफा, पौर्णिमा संयम, नगराध्यक्षा नगरपंचायत धानोरा वर्षाताई चिमुरकर, माजी नगराध्यक्ष आदी उपस्थित होते.
डॉ. राजरत्न आंबेडकर यांनी विविध विषयावर हात घातलाना बौद्ध समाजातील लोकांनी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शिक्षण घेऊन कलेक्टर, इंजिनिअर, पोलीस अधिकारी बनले पाहिजे हे बाबासाहेबाना अपेक्षित होते त्यासाठी शिक्षण घेतले पाहिजे . या देशातील बौद्धांनी भक्त न बनता अनुयायी बनले पाहिजे. पुढे बोलताना म्हणाले की ज्या देशांनी बुद्ध स्वीकारला त्या देशांनी प्रगती केली आहेत. आपण धम्म मेळावे कशासाठी घेतो तर बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गाने जर आपण गेलो तरच आपली आर्थिक प्रगती होऊ शकते तर दर रविवारी बुद्ध विहारात जाऊन सामाजिक, आर्थिक, राजकीय याविषयी चर्चा केली पाहिजे तरच बुद्धविहार हे खऱ्या अर्थाने क्रांतीचे केंद्र बनेल यासाठी कार्य करावे लागणार आहे. रिझर्व बँकेची निर्मिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या द प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथावर आधारित झाली आहे तरीपण एक एप्रिल हा दिवस एप्रिल फुल म्हणून दिवस साजरा केला जातो. बाबासाहेबांनी केलेले रिसर्च त्याचा उपयोग आपण करून घ्यायला पाहिजे पण तसें होताना दिसत नाही अशी खंत व्यक्त केली. द प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथावर देशाची अर्थव्यवस्था व रिझर्व बँक बनू शकते तर आपली बौद्धाची बँक का सुरू होऊ शकत नाही ? असा प्रश्न ही उपस्थित केला. यासाठी आम्ही काम सुरू केले आहे, संविधानाचे रक्षण करण्याची जबाबदारी भारतातील प्रत्येक नागरिकाची आहे, ज्यावेळेस संविधान जाळले त्यावेळेस रस्त्यावर किती लोक उतरले होते ? तर संविधान हे शोकेस मध्ये न ठेवता त्याचा वापर केला पाहिजे त्याचा अभ्यास केला पाहिजे असे या वेळेस सांगितले. त्याचबरोबर डॉ. राजरत्न आंबेडकर यांनी या बौद्ध परिषदेमध्ये तीन ठराव पारित केले त्यामध्ये पहिला ठराव आपली स्वतःची ओळख बौद्ध म्हणून केली पाहिजे , दुसरा ठराव आमची आर्थिक व्यवस्था उभी करण्यासाठी बौद्धांची स्वतंत्र बँक तयार केली पाहिजे, तिसरा ठराव या गडचिरोली जिल्ह्यामध्ये येत्या पाच वर्षात बौद्धचि स्वतंत्र शैक्षणिक संस्था म्हणजे शाळा कॉलेज उभे केले पाहिजे यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे असे तीन ठराव पारित करण्यात आले. तसेच या पाच वर्षांमध्ये सरकारी नोकऱ्या संपणार आहेत आणि म्हणून बाबासाहेबांकडे पैसे नव्हते पण विजन होते आज आपल्याकडे पैसा आहे पण व्हिजन नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून आम्ही जे काही कार्य करून ते देशाच्या प्रगतीसाठीच करू असे आपल्या भावना त्यांनी व्यक्त केल्या या धम्म परिषदेच्या माध्यमातून सर्वांनी मिळून काम केले पाहिजे असे आवाहन नवतरुणांना व बौद्धांना यावेळेस केले. डॉ. राजरत्न आंबेडकर यांना समता सैनिक दलकडून मान वंदना देण्यात आली तसेच वनराईची फुले या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आणि धम्म दान बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया देण्यात आले.
यावेळी बौद्ध समाज धानोरा चे अध्यक्ष सोपानदेव मशाखेत्री, उपाध्यक्ष शिवकुमार भैसारे, सचिव देवनाथ मशाखेत्री व बौध्द उपासक उपासिका गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.