The गडविश्व
ता .प्र / धानोरा, २ नोव्हेंबर : तालुक्यातील मुरुमगांव लगत असलेल्या रामपुर येथे सोमवार ३१ ऑक्टोबर रोजी श्री सहस्त्रबाहु अर्जुन यांच्या जयंती कार्यक्रम सर्व वर्गीय कलार समाज तर्फे पार पडले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष वेंकटेश जी बैरवार हे होते तर उपाध्यक्ष श्रीमती लता ताई पुंघाटी हे होत्या. उद्घाटक शंकर हिडको, प्रमुख अतिथि अजमन रावटे माजी सभापति धानोरा शामलाल नैताम, हरीश धुर्वे सरपंच पन्नेमारा, प्रा ओम देशमुख, मुकेश मेश्राम, राकेश बैरवार, आनंद दखने, शिवराम लाडे, योगेश कवाड़कर हे होते. यामधे सर्वप्रथम राजे सहस्त्रबाहु अर्जुन व माता कलारीन यांच्या फोटोचे विधिवत पूजन करुन गावात कलश यात्रा काढण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रस्तावना प्राध्यापक ओम देशमुख यानी केले, यानी सहस्त्रबाहु अर्जुन व माता कलारीन यांच्या जीवन परिचय करून कलार समाज हां संपूर्ण भारतात अस्तित्वात आहे पण विखुरलेला आहे त्या करिता संघटना असने गरजेचे आहे अशी माहिती सांगीतली तसेच मान्यवरानी सहस्त्रबाहु अर्जुन यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमात रंगारंग कार्यक्रम लहान मुलानी सादर केले. कार्यक्रमाचे संचालन तुलाराम नैताम यानी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता लोकेश बैरवार, अरविंद ईबतिवार, जयंत ईबत्तीवार, डेविड मेश्राम, नरेश बैरवार, मनोज मडावी, संचित देशमुख, प्रभा मेश्राम, तुलसी दरवडे रेखा जाड़े यानी सहकार्य केले.